कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित पाटील प्रशिक्षणादरम्यान शहीद


कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित पाटील प्रशिक्षणादरम्यान शहीद
पॅरा कमांडो प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी घटना; आज सकाळी ११ वाजता कोळपिंप्री येथे अंत्यसंस्कार
पारोळा : तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी नारायण रामलाल पाटील यांचे सुपुत्र रोहित नारायण (काटे) पाटील हे पॅरा कमांडो प्रशिक्षणादरम्यान शहीद झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. त्यांच्या शहादतीने कोळपिंप्री गावासह पारोळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
रोहित पाटील हे देशसेवेसाठी भारतीय सैन्यात कार्यरत होते. पॅरा कमांडो प्रशिक्षण घेत असताना त्यांना वीरमरण आले. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहीद जवान रोहित पाटील यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोळपिंप्री येथून काढण्यात येणार असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची माहिती देण्यात आली आहे.
रोहित यांच्या शहादतीची बातमी समजताच गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
शहीद जवान रोहित पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जय हिंद! 🇮🇳







