Other

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा रोहिणी खडसेंकडून निषेध

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा रोहिणी खडसेंकडून निषेध

‘सफेद’ कापडाने सरकारच्या ‘काळ्या’ कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न; सरकारला खडसेंचा सवाल

जळगाव | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी, पोलिसांनी ‘सफेद’ कापडाचा वापर करून सरकारच्या ‘काळ्या’ कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून पोलिसांनी हटवल्याच्या घटनेवर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी या कारवाईशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सरकारला प्रश्न विचारले.

सरकारला खडसेंचे प्रश्न

रोहिणी खडसे म्हणाल्या, “एक व्यक्ती सरकारच्या चुकीच्या व्यवस्थेविरोधात लढत आहे, हे तुम्ही लपवू शकता; मात्र पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची उद्ध्वस्त झालेली स्वप्ने आणि झालेल्या आत्महत्या कशा लपवणार? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ सत्ताधारी किती दिवस लपवणार? तसेच सरकार आपल्या चुकांवर किती काळ पांघरूण घालणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button