मेहरुण परिसरात गावठी कट्टा बाळगणारा एलसीबीच्या जाळ्यात

मेहरुण परिसरात गावठी कट्टा बाळगणारा एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील मेहरुण भिलाटी परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मंगळवारी (२७ मे २०२५) अटक केली. अटक केलेला तरुण विशाल संजय पवार हा मेहरुण भिलाटी येथील रहिवासी आहे.एलसीबीला गुप्त माहिती मिळाली होती की, विशाल पवार पाण्याच्या हौदाजवळ संशयास्पदरित्या गावठी कट्ट्यासह उभा आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा आणि मॅगझीन जप्त करण्यात आले.याप्रकरणी विशाल पवार याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि प्रदीप चवरे यांचा सहभाग