Social

डॉ. श्रद्धा पाटील यांना युवा अमंग गायनॅकोलॉजी पुरस्काराने सन्मानित

प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यस्तरीय सन्मान

डॉ. श्रद्धा पाटील यांना युवा अमंग गायनॅकोलॉजी पुरस्काराने सन्मानित

प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यस्तरीय सन्मान
जळगाव प्रतिनिधी

चंद्रपूर येथे झालेल्या अखिल महाराष्ट्र प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ असोसिएशनच्या राज्यस्तरीय गायनॅकोलॉजी कॉन्फरन्समध्ये जळगावच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा पाटील यांना ‘युवा अमंग गायनॅकोलॉजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कॉन्फरन्समध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील ४१ स्त्रीरोग तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.

त्यामधून केवळ पाच तज्ज्ञांना ‘युवा अमंग गायनॅकोलॉजिस्ट’ पुरस्कार देण्यात आला, आणि डॉ. श्रद्धा पाटील या त्या मानकऱ्यांपैकी एक ठरल्या.
राज्य असोसिएशनतर्फे पहिल्यांदाच या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच मानकरी होण्याचा बहुमान डॉ. पाटील यांना मिळाला आहे.
त्यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सन्मानाबद्दल जळगाव स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास भोळे, सचिव डॉ. शीतल भोसले व असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांचे मनः पूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button