Crime
हॉटेल चालकाची मुजोरी, वऱ्हाडी मंडळींसोबत वाद

महा पोलीस न्यूज । ९ जुलै २०२४ । सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जात आहे. जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर हॉटेल मालकाने वऱ्हाडी मंडळीसोबत वाद घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळा संपल्यावर काहीतरी कारणावरून हॉटेल मालक आणि वऱ्हाडीमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने दोघांमध्ये हाणामारी देखील झाली.
वादात काही मंडळींनी मध्यस्थी केल्यावर माफीनामा नाट्य सुरू झाले. अखेर काही मंडळींच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. जळगाव शहरात वादाची चांगलीच चर्चा आहे.