Big Breaking : पोलीस कोठडीत संशयीत आरोपीने घेतला गळफास

महा पोलीस न्यूज | ९ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या एका संशयीत आरोपीने पोलीस लॉक अपमध्ये असलेल्या शौचालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी त्याठिकाणी पोहचले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मारवड पो.स्टे.ला दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्हा क्रमांक २१/२०२४ भादंवि कलम ३७९ मधील गुन्ह्यात पोलिसांनी संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत वय ४९ रा.डांगरी प्र.ता.अमळनेर यास दि.२ मार्च रोजी ९.४१ वाजता अटक केली होती. गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत दि.६ मार्च रोजी संपल्याने त्यास मारवड पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजी. क्रमांक २५/२०२४ भादंवि कलम ३७९ दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी घेऊन वर्ग केले होते.
पोलीस कोठडीत असताना शनिवार दि.९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास (वेळ नक्की नाही) पोलीस लॉकअप मधील शौचालयात संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत वय ४९ रा.डांगरी प्र.ता.अमळनेर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पांघरण्यासाठी दिलेल्या चादरच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याची माहिती आहे. बराच वेळ होऊनही तो बाहेर येत नसल्याने गार्डने पाहिले असता घटना उघड झाली. घटना निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
अमळनेर येथे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी पोहचले असून चौकशी सुरु असल्याचे समजते.