Crime

लग्नसमारंभातून चोरीस गेलेले 26 तोळे सोने मध्य प्रदेशातून जप्त (पहा व्हिडिओ)

मोहाडी पोलिसांची कारवाई

धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे दोन डिसेंबर रोजी संगीताचा कार्यक्रम असल्याने या ठिकाणाहून रात्री करण्या चोरट्याने 26 तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास करून मध्य प्रदेशातील राजगड येथून चार जणांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दोन डिसेंबर रोजीप्रतिभा राजेंद्र बोरसे यांची मुलगी सलोनी राजेंद्र बोरसे हिचे लग्नसभारंभाचा रात्री 09.15 वा. सुमारांस धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे श्रीमंती पुजन व संगीताचा कार्यक्रम असल्याने ते त्यांचे परिवारासह कार्यक्रम स्थळी असतांना फिर्यादी यांचे पर्स मध्ये नवरीचे व फिर्यादी यांचे एकूण 26 तोळे सोने त्यात सोन्याचे पोहे हार, नेकलेस, सोन्याचे काप, बांगडया, तिन चैन, टाप्स, इतर सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल असे एकूण पंधरा लाख 98 हजार रुपये किंमतीचे दागिने कार्यक्रम सुरू असताना चालू असतांना एक लहान मुलगा व मोटारसायकल वरून आलेले अज्ञात इसमांनी चोरून नेले. याबाबत मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे तीन डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता  पोलीस अधीक्षक,  श्रीकांत धिवरे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना गुन्हयाचे तपासकामी सुचना देवून गुन्हा उघडकीस आणणे कामी आदेश दिले. प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी  गुन्हयाचे तपासकामी माहिती घेतली असता नंदुरबार जिल्हयातील शहादा पोलीस ठाणे व अकोला जिल्हयात देखील अशाच प्रकारे गुन्हे दाखल असून चोरी करण्याची पध्दत देखील सारखीच असल्याचे दिसून आले. प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी पीएसआय अशोक पायमोडे, प्रकाश जाधव, मनिष सोनगिरे अशांचे एक विशेष पथक तपासकामी तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील व विशेष पथकातील अंमलदारांनी गोपनिय रित्या माहिती मिळविली की, लग्न समारंभात चोरी करणारी गैंग हि मध्यप्रदेश राज्यातील राजगढ जिल्हयातील बोडा पोलीस ठाणे अंतर्गत सांसीकढीया, गुलखेडी येथील असल्याची माहिती प्राप्त करून त्याबाबत वरिष्ठांना कळवून सदरचे विशेष तपास पथक हे जिल्हा राजगढ, मध्यप्रदेश येथे रवाना केले. विशेष तपास पथकातील  अशोक पायमोडे,  प्रकाश जाधव, व मनिष सोनगिरे अशांनी सदर ठिकाणी सतत नऊ दिवस दिवस राहून प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेवून तेथे गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती काढून चोरी करणारे गौरव बबलू सांसी,  सावंत ऊर्फ चप्पू भारतसिंग सांसी,कालू गोली सांसी, बबलू सुमेर सिसोदिया, सर्व रा. हुलखेडी, गुलखेडी, ता. पचोड, जि.राजगढ हे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नातेवाईक यांची माहिती काढून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली. वरील नमुद आरोपी हे वास्तव्य करीत असलेल्या गुलखेडी गावाकडे जाणा-या रस्त्यालगत असलेल्या जंगलात वास्तव्य करीत असलेल्या घरवजा झोपडी या ठिकाणी तुम्हांला मिळतील अशी माहिती मिळल्याने सदरचे पथक यांनी बोडा पोलीस ठाणे यांचे मदतीने कारवाई केली. मात्र पोलीस आल्याच्या कुणकुण लागतात सर्व आरोपी पसार झाले. वर्णनाप्रमाणे असल्याची खात्री झाल्याने सदर दाखल गुन्हयातील 26 तोळे सोन्याचा मुद्देमाल हा जप्त करून हस्तगत करण्यांत आला आहे.

कारवाई  पोलीस अधीक्षक श श्रीकांत धिवरे,  अपर पोलीस अधीक्षक  किशोर काळे,  धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी  राजकुमार उपासे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोहाडी पोलीस ठण्याचे प्रभारी अधिकारी शशिंकात पाटील यांचे पथकातील /अशोक पायमोडे, प्रकाश जाधव व मनिष सोनगिरे या पथकाने कामगिरी पार पाडली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई अशोक पायमोडे मोहाडी नगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button