OtherCrime

कानळद्यात १७ वर्षीय तरुणीची विषप्राशन करून आत्महत्या

कानळद्यात १७ वर्षीय तरुणीची विषप्राशन करून आत्महत्या
उपचारादरम्यान मृत्यू; तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कानळदा येथील १७ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. नीता दिलीप सोनवणे (वय १७, रा. कानळदा) असे मृत तरुणीचे नाव असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलीप सोनवणे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी नीता हिने ८ जून रोजी ‘शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी जात आहे’ असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, काही वेळातच तिने विहिरीलगत विषारी औषध प्राशन केले. नंतर घरी आल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या होऊ लागल्याने तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व उपचारांनंतरही १३ जून रोजी रात्री तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप राजपूत करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button