Crime

१७ पाणबुडी मोटारी आणि ४ मोटारसायकल चोरीप्रकरणी तिघांना अटक

१७ पाणबुडी मोटारी आणि ४ मोटारसायकल चोरीप्रकरणी तिघांना अटक
भडगाव (प्रतिनिधी): पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीप्रकरणी तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण १७ पाणबुडी मोटारी आणि ४ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे , पो.ह.लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.कॉ.जितेंद्र पाटील, पो.कॉ.भुषण पाटील, चा.पो.ह. भारत पाटील यांचे पथक नेमण्यात आले होते. पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सचिन बापुराव पाटील (वय २९, रा. पिंपरी, ता. पाचोरा) याने आपल्या दोन साथीदारांसह पाणबुडी मोटारींची चोरी केली आहे.

पोलिसांनी तातडीने पिंपरी गावात धाव घेत आरोपी सचिन पाटील याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भगवान लक्ष्मण पाटील (वय ३६) व राहुल त्र्यंबक पाटील (वय २२) या दोघांसोबत मिळून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये (गु.र.नं. ८५/२०२५ आणि ११५/२०२२) पाणबुडी मोटारी चोरल्याची कबुली दिली.

तिघांकडून एकूण १७ पाणबुडी मोटारी जप्त करण्यात आल्या.तसेच, पुढील तपासादरम्यान पाचोरा शहर आणि तालुक्यातून ४ मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड झाले. या वाहनांच्या चोरीसंदर्भात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत (गु.र.नं. ७९/२०२५, १०१/२०२५, १४६/२०२५). सदर तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदवून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि स्थानीय गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button