Social

माहिती अधिकार कार्यकर्ते २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार!

महा पोलीस न्यूज । दि.१३ जानेवारी २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील गट १६७ पैकी ५१ व काकोडा १६७ पैकी ३६, १६७ पैकी २७ यामधील वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर करतांना पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी मिळून शासनाची फसवणूक केली. याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी कारवाईबाबत अप्पर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने येत्या दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.

याबाबत केदार सानप यांनी दिलेली माहिती अशी की, दि.१९ एप्रिल २०२४ रोजी अप्पर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे याकरिता तक्रार अर्ज दाखल केला होता. अर्जाची दखल घेत विभागीय आयुक्त यांनी पत्राने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना आपल्या स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे, अशी विनंती कुंदन हिरे आयुक्त कार्यालय तहसीलदार अस्थापना यांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. मात्र सदर पत्रानुसार कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या अर्जावरती व त्यानंतर दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुध्दा कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दि.२ डिसेंबर २०२४ रोजी लोकशाही दिनी तक्रार अर्ज दाखल केला होता व त्यावरती उत्तर देतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार महसुल ज्योती गुंजाळ यांनी लोकशाही दिन संदर्भात प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडिल आदेश अन्वये समिती गठीत करण्यात आलेली असून सदरील वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरीत आदेशाबाबतची संचिका कामकाज तपासणी समितीमार्फत सुरू आहे. या आदेशाबाबत संचिका तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. समिती अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कळविण्यात आले आहे.

समितीतील अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केदार सानप यांनी केला आहे. त्या अनुषंगाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी दि.२ जानेवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना उपोषणास बसण्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी माध्यमांना कळविले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button