Crime

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले !

चाळीसगाव विभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले !

चाळीसगाव विभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई

भडगाव -प्रतिनिधी

भडगाव शहर परिसरासह तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरु असून वाळू माफियांवर कारवाई होऊन देखील हा प्रकार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आज. दरम्यान आज पोलिसांनी अवैध वाळू वाहून नेणारे डंपर पकडले असून दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

हि कारवाई आज सकाळी चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पो.हे.कॉ. संभाजी पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र निकम व ज्ञानेश्वर बडगुजर, एस , एम यांच्या पथकाने कारवाई करून वाळूचे डंपर पकडले आहे. यावेळी डंपर ड्रायवर अनिल मलखन वंजारी रा. पळसखेडे व ढंपर मालक रविंद्र पवार रा. पेठ भडगाव हे आहेंत अशी माहिती पथकाने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव तालुक्यात व भडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज 50 ते 60 डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचललेला आहे व तो बडगा कायम सुरू राहणार आहे. यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्राजेश चंदेल यांच्या पथकाने सकाळीं पाच वाजता वलवाडी गावाच्या दरम्यान डम्परांवर कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे येथीलही डंपर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button