Crime

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी सासरा व दीर यांना अटक 

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी सासरा व दीर यांना अटक 

पुणे (प्रतिनिधी) – वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणातील सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अखेर पोलिसांनी आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता अटक केली आहे. या दोघांविरोधात शोधमोहीम सुरू होती. त्यांच्या अटकेमुळे प्रकरणात महत्त्वपूर्ण कलाटणी येण्याची शक्यता आहे.

वैष्णवी हगवणे (वय २३) हिने सासरकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. मात्र सासरा आणि दीर फरार होते.

त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी चार विशेष पथकांची स्थापना केली होती. अखेर सात दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी कुठे लपले होते, अटक कशी झाली, यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाची तात्काळ दखल

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने पहिल्याच दिवशी सुमोटो दाखल केला होता. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक्स (Twitter) वरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कायदा व सुव्यवस्था यंत्रणा काम करत आहे. गुन्हा दाखल असून आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे.”

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button