Crime

एकुलती येथे तरुण शेतकऱ्याचा विषप्राशनाने मृत्यू

एकुलती येथे तरुण शेतकऱ्याचा विषप्राशनाने मृत्यू

उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास; कुटुंबीयांमध्ये हळहळ

जळगाव प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील एकुलती गावातील शुभम गणेश शेवाळे (वय १९) या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असतानाच २ मे रोजी रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे.

शुभम शेवाळे हा आपल्या आई-वडील आणि भावासोबत एकुलती गावात राहत होता. वडील गणेश शेवाळे यांच्यासह तो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास शुभम याने अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते; मात्र प्रकृती खालावल्याने शुक्रवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button