Crime
एरंडोल येथे रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाला भरधाव कारने उडविले

एरंडोल : रस्ता ओलांडतांना भरधाव कारच्या घडकेत सुनिल भिमसिंग पाटील (वय ४८, रा. | सावखेडा होळ, ता. पारोळा) हे गंभीर जखमी झाल्याची घटना 25 रोजी हिमालय पेट्रोल पंपाजवळ घडली होती मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील सुनिल पाटील हे दि. २५ रोजी महामार्गावरुन जात असतांना रस्ता ओलांडत होते. यावेळी त्यांना (एमएच १२, यूडबल्यू ७३२७) क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका किरण पाटील हे करीत