Social

नूतन मराठा महाविद्यालयातर्फे पद्मश्री चैत्राम पवार यांचा सन्मान

नूतन मराठा महाविद्यालयातर्फे पद्मश्री चैत्राम पवार यांचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करून गावाचा सर्वांगीण विकास साधणारे पद्मश्री चैत्राम पवार यांचा सत्कार सोहळा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित, जळगाव संचलित नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला. त्यांच्या हस्ते पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. रणजीत चव्हाण यांनी “चैत्राम पवार हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवांचे कथन करून उपस्थितांमध्ये चैत्राम पवार यांच्याविषयी उत्सुकता निर्माण केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, पद्मश्री चैत्राम पवार यांनी बारीपाडा या छोट्याशा गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे नावारूपास आणले, याविषयीचा माहितीपट दाखवण्यात आला. सत्काराला प्रतिसाद देताना चैत्राम पवार म्हणाले की, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न स्वीकारता, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले. गावकऱ्यांची मने जिंकून त्यांना या कार्यात सहभागी करून घेतले. ‘जल, जंगल, जमीन, जन, जनावर’ या पंचसूत्रीवर आधारित अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी बारीपाडा या आदिवासी गावाला जगाच्या नकाशावर दुसऱ्या क्रमांकाचे आदर्श गाव बनवले. या प्रवासात त्यांना अनेकांची साथ मिळाली, तसेच विरोधही झाला; परंतु त्यांनी आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले. नूतन मराठा महाविद्यालयाने त्यांच्या या योगदानाला सत्कार करून प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले, तर प्रा. तेजल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी. आर. चव्हाण, प्रा. एन. जे. पाटील, प्रा. राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. डॉ. मंगला तायडे, प्रा. वंदना पाटील, प्रा. सुनील गरुड यांच्यासह प्रा. आर. बी. देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते नूतन मराठा महाविद्यालयात वृक्षारोपण

नूतन मराठा महाविद्यालयात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तसेच जळगावचे प्रसिद्ध डॉ. रणजीत चव्हाण आणि प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या उपस्थितीत विविध उपयुक्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब नाईक, अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील आणि प्रा. शिवराज पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button