खान्देशातील सर्वात मोठा अॅडवेंचर पार्क जळगावात, उद्यापासून जनतेच्या सेवेत खुला होणार!

महा पोलीस न्यूज । दि.२० एप्रिल २०२५ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच शहरात प्रथमच एका भव्य आणि अत्याधुनिक व्हीपीडी अॅडवेंचर पार्कचे उद्घाटन उद्या दि.२१ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांसाठी हा एक नवा मनोरंजनाचा खजाना ठरणार असून, सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करणाऱ्या विविध मनोरंजनात्मक सुविधांनी सजलेला हा पार्क एक अनोखा अनुभव देणार आहे.
मनोरंजनाचा धमाका, सर्वांसाठी काहीतरी खास
अँडवेंचर पार्कमध्ये लहान मुलांसाठी सॉफ्ट प्ले झोन उपलब्ध असून मोठ्यांसाठीही विविध थरारक आणि तंत्रज्ञानाने समृद्ध खेळांची सोय आहे. ट्रंपोलिन पार्क, व्हर्चुअल रियालिटी (VR) गेम्स, व्ही.आर. शूटिंग गेम्स, चेअर गेम्स अशा नवनवीन खेळांमुळे याठिकाणी आल्यानंतर वेळ कसा गेला हे लक्षातही येणार नाही.
कुटुंबियांसाठी खास सोयी
फक्त खेळच नाही तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून आनंद घेता यावा यासाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ मुलांसाठीच नव्हे तर कुटुंबीयांसाठीही परिपूर्ण ठरणार आहे.
खाद्य रसिकांसाठी स्वादिष्ट मेजवानी
मनोरंजनासोबतच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अँडवेंचर पार्कमध्ये अत्याधुनिक आणि सुसज्ज रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये साउथ इंडियन, चायनीज, इटालियन, तंदूरी, स्टार्टर आदी प्रकारचे चवदार खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. नागपूर येथील एक प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड देखील इथे असणार आहे.
प्रशिक्षित कर्मचारी व सुरक्षित वातावरण
सुमारे दहा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रफळामध्ये पूर्णपणे वातानुकूलित आणि सुरक्षित वातावरणात हा अँडवेंचर पार्क उभारण्यात आला आहे. येथे १० कुशल कर्मचारी खेळादरम्यान मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असणार आहेत.
नागरिकांना विशेष आवाहन
नव्या अँडवेंचर पार्कचा अनुभव घ्यावा, आपल्या कुटुंबासोबत एक आनंददायी क्षण घालवावा असे आवाहन पार्कच्या संचालकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला विमल जैन, पूर्वख देढिया, देवेंद्र व्यास यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. उद्या दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन समारंभानंतर हा पार्क सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे.