Crime
महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोनपोत लांबवली; अमळनेर शहरातील घटना

अमळनेर : येथील बाजार समितीच्या मागे असणाऱ्या गुरुकृपा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेची पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने सोनपोत लांबविल्याची घटना सतरा रोजी सायंकाळी उघडकीस आले असून याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुकृपा कॉलनीमधील रहिवाशी रत्ना किशोर देसले (वय ४५) या सायंकाळी बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्याने जात असताना एका दुचाकीने आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून नेली.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.