CrimePolitics

“स्मार्ट ई-बीट सिस्टीम”चे उद्घाटन; पालकमंत्र्यांच्या खात्याच्या चुकीच्या उल्लेखाने चर्चेला उधाण

“स्मार्ट ई-बीट सिस्टीम”चे उद्घाटन; पालकमंत्र्यांच्या खात्याच्या चुकीच्या उल्लेखाने चर्चेला उधाण

जळगाव l महा पोलीस न्यूज l

जळगाव पोलिस दलाच्या “स्मार्ट ई-बीट सिस्टीम” या नव्या डिजिटल प्रणालीचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, उद्घाटनप्रसंगी लावण्यात आलेल्या डिजिटल स्क्रीनवर त्यांच्या खात्याच्या उल्लेखात जलसंपदा मंत्री असा उल्लेख झाल्याने याबाबत एकच चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसून आले.मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंपदा आणि पाणीपुरवठा हे पाण्याची संबंधित खाते असल्याने यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही असा खुलासा त्यांनी बोलताना केला.

 ‘जलसंपदा मंत्री’ असा चुकीचा उल्लेख

स्क्रीनवर ‘जलसंपदा मंत्री’ असा उल्लेख झाल्याने हा प्रकार तत्काळ उपस्थितांच्या लक्षात आला. विशेष म्हणजे, सध्या जलसंपदा विभागाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे असून, गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री आहेत. जळगावचेच मंत्री असूनही त्यांच्या खात्याबाबत गोंधळ झाल्याने काहीसा हास्यस्पद व चर्चेचा विषय निर्माण झाला.

मंत्र्यांची संयमी प्रतिक्रिया

या चुकीवर स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांनी संयम राखत नम्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, “पाणीपुरवठा आणि जलसंपदा ही दोन्ही खाती पाण्याशी संबंधित असल्याने चूक मानवी स्वरूपाची आहे. मला याचे काहीच वाईट वाटले नाही.”

‘स्मार्ट ई-बीट सिस्टीम’मुळे पोलीस गस्त होणार अधिक कार्यक्षम

या वेळी उद्घाटन झालेली ‘स्मार्ट ई-बीट सिस्टीम’ ही एक आधुनिक डिजिटल प्रणाली असून ती मोबाईल अ‍ॅप आणि वेब प्लॅटफॉर्मद्वारे पोलिसांची गस्त नियंत्रण, हजेरी व देखरेख अधिक पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहे. भारतातील काही ठिकाणी ही प्रणाली आधीच कार्यरत असून आता ती जळगाव जिल्ह्यातही वापरात येणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button