

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत दुसखेडा येथे विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ वितरीत
जळगाव: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक दाखले व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने यावल तालुक्यातील दुसखेडा येथे अभियानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाद्वारे नागरिकांना विविध शासकीय दाखले व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये १७ जात प्रमाणपत्र,१२ अधिवास प्रमाणपत्र, ५ रेशन कार्ड, संजय गांधी योजना लाभ तसेच इतर आवश्यक शासकीय दाखले व सेवांचा समावेश आहे.
या अभियानामुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना आवश्यक दाखले व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यात आला आहे . या कार्यक्रमाला यावल तहसीलदार रजनी नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी, विविध विभागाचे प्रतिनिधी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.







