Politics

मोठी बातमी : स्मिता वाघ, रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महा पोलीस न्यूज । २५ एप्रिल २०२४ । महायुतीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे या आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु उपमुख्यमंत्री यांना येण्यास उशीर होत असल्याने दोघांनी उमेदवारी अर्ज दुपारी दाखल केला आहे.

 

महायुतीकडून  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला काही काळ उशीर असल्याने गैरसोय टाळण्यासाठी दोन्हीही उमेदवारांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button