अमळनेर-धार रस्त्याच्या १ कोटी ८८ लाखांच्या कामाचे भूमिपूजन

अमळनेर-धार रस्त्याच्या १ कोटी ८८ लाखांच्या कामाचे भूमिपूजन
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर : मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–धार–मारवड–निम–कपिलेश्वर या प्रजिमा ४९ मार्गावरील अमळनेर ते धार दरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन रविवार, १५ नोव्हेंबर रोजी धार येथे उत्साहात पार पडले. तब्बल १ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रस्त्याच्या किमी ३३/३०० ते ४०/०० या टप्प्यात सुधारणा करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर धारसह परिसरातील गावांच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीमालाची वाहतूक, शैक्षणिक सुविधा आणि आरोग्यसेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाचे महत्त्वाचे माध्यम असून, चांगल्या रस्त्यांमुळे गावांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती मिळते. अमळनेर ते धार रस्त्याच्या सुधारणेमुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची दळणवळणाची अडचण दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सरपंच गणेश धोंडू पाटील, यशवंत शंकर पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, यशवंत धोंडू पाटील, किरण हिम्मतराव पाटील (मालपूर), किरण भाईदास पाटील (मालपूर), संजय टेलर, बाबू पेंटर, उमाकांत भाऊसाहेब, डॉ. विलास पाटील, भानुदास पाटील, रज्जाक शाह, माजी सरपंच वसंत काटे, सतीश उत्तम पाटील, बाळू ड्रायव्हर, शौकत सय्यद, सत्तार मुजावर, खाटीक सर यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला १ कोटी ८८ लाखांचा निधी हा परिसराच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.







