आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलिसांची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलिसांची बैठक
पोलीस पाटील तसेच मंदिर-मस्जिद भोंगे परवानगीबाबत चर्चा; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना
अडावद : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील तसेच मंदिर व मस्जिद भोंगे परवानगीच्या अनुषंगाने सोमवारी (१० ऑगस्ट) बैठक घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत ही बैठक पार पडली.
अडीअडचणी जाणून घेतल्या
बैठकीदरम्यान आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने गावपातळीवरील अडीअडचणी तसेच संभाव्य समस्या जाणून घेण्यात आल्या. उपस्थितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
कायदा-सुव्यवस्थेबाबत दक्षतेच्या सूचना
सण-उत्सव काळात कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या. मंदिर-मस्जिद भोंगे परवानगीसह विविध बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले.
बैठक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली.







