सुकळी येथील गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोचे साहित्य जाळून खाक


सुकळी येथील गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोचे साहित्य जाळून खाक
मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील सुकळी येथे मधुकर बळीराम नेहते यांच्या वाड्यातील गोडाऊनला दि 2 रोजी सकाळी अकराच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली मात्र लाखोचे साहित्य जळून खाक झाले. रावेर व बोडवड नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडयांना पाचारण कार्यात आले होते मात्र तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी आग आटोक्यात आली. यामुळे नुकसानीचा आकडा वाढला.
सुकळी येथील शेतकरी मधुकर बळीराम नेहते यांच्या मालकीचे गोडाऊन असून त्यात ठीबक पाईप व इतर शेतीसाहित्य जळून खाक झाले तसेच सह्याद्री फ्रुट्स कंपनीचे चेतन उन्हाळे यांनी भाडे तत्वावर ठेवलेले अंदाजे सुमारे 12-13 लाखाचे फ्रुट एक्स्पोर्ट चे पॅकिंग साहित्य अग्निच्या भक्ष्यस्थानी पडले.
लागलेल्या या भीषण आगीत लाखो रुपयांचे संबंधितांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. प्रथमदर्शनी लागलेली आग विझाविण्यासाठी ग्रामस्थ व तरुणांनी प्रयत्न केले मात्र अगीच्या भीषणता तीव्र होती परिणामी बोदवड येथून नगरपंच्यातीची अग्निशमन बंब व रावेर येथीन एक अशा दोन गाड्या घटनास्थळी तातडीने दखल झाल्या. पाच टॅंक पाणी वापरून तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.







