Crime

जळगाव शहरातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगाव शहरातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

दोन बुलेट हस्तगत एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून हे गुन्हा उघडकीस आणण्याच्यासूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्यानुसार
सिंधी कॉलनी आणि मास्टर कॉलनी येथून दोन बुलेट मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गणेशोत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार किशोर पाटील यांनी सिंधी कॉलनी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे जावेद शेख चांद रा मास्टर कॉलनी आणि अदनान अमजद खान शाहूनगर या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे 22 फेब्रुवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता 24 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांनी सिंधी कॉलनी येथील हर्षद दिलीप कुमार नागपाल यांची बाबा नगर येथील घरासमोरून 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेदहा ते साडेपाच वाजेच्या सुमारास बुलेट चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोठडी दरम्यान  दोन्ही आरोपींनी मास्टर कॉलनी येथून सुद्धा एक बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके ,पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे ,पोलीस नाईक किशोर पाटील ,योगेश बारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील ,राहुल घेटे, आदींच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button