Other

वृक्षरोपणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता रुजविणे काळाची गरज

वृक्षरोपणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता रुजविणे काळाची गरज
अमळनेर, पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी जय योगेश्वर विद्यालय, अमळनेर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. डी .पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्वप्रथम उपस्थित मान्यवर प्रा. डॉ. नयना कैलास पाटील मॅडम आणि उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी निम वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त परिसर याबाबत जनजागृती केली. संशोधक मार्गदर्शिका प्रा.डॉ. नयना वाणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

“झाडे लावा, झाडे जगवा” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून, वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे प्रमुख मान्यवर प्रा. डॉ. नयना कैलास पाटील मॅडम यांनी सांगितले. “वृक्ष हे पर्यावरणाचा आधार असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे,” तसेच “केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही, तर लावलेली झाडे जगवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असा संदेश विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षिका स्मिता सुखदेवराव वानखडे यांनी दिला. वृक्षारोपण कार्यक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करून पर्यावरण साक्षरता ही संकल्पना रुजवण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. पी. डी. पाटील, प्रा. अरुण महाजन, प्रा संतोष शिंगाणे, प्रा संजय पाटील, प्रा.कल्पना पाटील, प्रा. उत्तरा पाटील, प्रा. रत्नमाला कुवर, प्रा वैशाली भदाणे, प्रा. पुनम वाघ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button