Crime

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

२६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त; रोड रोलरखाली चिरडून केले नष्ट

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

२६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त; रोड रोलरखाली चिरडून केले नष्ट

जळगाव | प्रतिनिधी — शहरात मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध जळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यानंतर हे सायलेन्सर रोड रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

पोलिसांची धडक कारवाई

मॉडिफाईड सायलेन्सरमुळे होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम राबविली. कारवाईदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींवरील बदल केलेले सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.

२५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या २६ सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते कायमस्वरूपी नष्ट करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना होतो त्रास

मॉडिफाईड सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांनी कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यापुढेही मॉडिफाईड सायलेन्सर तसेच कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांविरुद्ध तपासणी व कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगावसाठी आवाहन

“कर्कश आवाज नको, शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे! वाहतूक नियम पाळा, ध्वनिप्रदूषण टाळा आणि नागरिकांचा त्रास टाळा,” असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे, अफजल बागवान आणि फिरोज तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button