Social

भडगाव व्हिजन सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया

भडगाव व्हिजन सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया

भडगाव : प्रतिनिधी बालाजी संस्थानअंतर्गत मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा यांच्या वतीने भडगाव येथे गेल्या वर्षभरापासून व्हिजन सेंटर कार्यरत आहे. या सेंटरचे संचालक प्रा.डॉ. दिनेश तांदळे असून, ऑप्टोमेट्रिस्ट अविनाश मोरे रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळत आहेत.
दर शुक्रवारी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी भडगाव व परिसरातील रुग्णांना नांदुरा येथे पाठविण्यात येते. आज (शुक्रवारी) एकूण ११ महिला व पुरुष रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ पत्रकार श्री. शिवदास आप्पा महाजन व त्यांच्या पत्नी सौ. आशा महाजन यांनी उपस्थित राहून रुग्णांना शुभेच्छा दिल्या. व्हिजन सेंटरच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सेंटरच्या माध्यमातून एका वर्षात भडगाव व परिसरातील सुमारे ५०० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सेंटरमध्ये स्नेहाताई मोरे व सूर्यवंशी ताई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
रुग्णसेवेचा ध्यास आणि सामाजिक बांधिलकी जपत मोहनराव नारायणा नेत्रालयाची ही आरोग्यसेवा अविरत सुरू असून, भडगाव व परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या सेवाकार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button