Social

भडगावात लोककलेतून संविधानाचा प्रसार

भडगावात लोककलेतून संविधानाचा प्रसार

भडगाव : प्रतिनिधी भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त भडगाव बसस्थानक परिसरात गोरबोध फाउंडेशन, राष्ट्रीय महापुरुषांचे फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्था आणि संविधानप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. शाहिरी पोवाडे, भारूड, वही गायन,लोकगीते, पथनाट्य व संवाद अशा लोककला प्रकारांतून संविधानातील मूल्यांचा जागर करण्यात आला.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष अनिल पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून योजना पाटील, माजी पोलिस निरीक्षक अशोक केदार आणि मेहताबसिंग नाईक उपस्थित होते.

यावेळी शाहीर मांगीलाल मोरे, परशुराम सूर्यवंशी, तुषार थोरात, अभिजित सूर्यवंशी, सचिन सोमनाथ राठोड, मगन पंजू भराडी, आत्माराम बोरसे आणि दगडू पवार यांनी लोककलेतून संविधानाचे विचार मांडले. तसेच सचिन राठोड यांनी संविधानावर भाषण केले. सूत्रसंचालन परशुराम सूर्यवंशी यांनी केले, तर आभार मांगीलाल मोरे यांनी मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button