Politics

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात

चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली बैठक; महिला मोर्चाच्या संघटन बळकटीवर सविस्तर चर्चा

चोपडा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव पूर्वच्या वतीने चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा संध्याताई महाजन होत्या.

बैठकीला प्रदेश प्रभारी सविताताई जैसवाल, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, धुळे महापौर तथा प्रदेश महामंत्री महिला मोर्चा जयश्री कमलाकर अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेश महाजन, मंडळ अध्यक्ष कांतीलाल पाटील, नरेंद्र पाटील, पिंटू भाऊ पावरा, गजेंद्रभाऊ जैस्वाल, अशोक शिंपी, देवदत्त वैद्य यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. बूथ स्तरापासून प्रभाग स्तरापर्यंतच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. संघटन विस्तार, महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार तसेच आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाचे संघटन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याचे आवाहन केले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला.

जयश्री कमलाकर अहिरराव यांनी संघटन बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. रेखाताई वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी मार्गदर्शन केले.

जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा संध्याताई महाजन यांनी महिला शक्तीला संघटित करून पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे आवाहन केले. आगामी काळात महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीला जळगाव पूर्व विभागातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संघटन बळकटी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button