Politics

भाजपा महिला भडगाव शहर अध्यक्षपदी योगिता वाघ यांची नियुक्ती

भाजपा महिला भडगाव शहर अध्यक्षपदी योगिता वाघ यांची नियुक्ती

भडगाव प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये सौ. योगिता अनिल वाघ यांची भाजपा महिला भडगाव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे वृत्त समजताच भडगाव शहर व परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे. योगिता ताई ह्या अनिल वाघ यांच्या पत्नी आहते. ते योगिता ताई यांच्या मागे समाजकारणात व राजकारणात खंबीरपणे उभे असतात व त्यांच्या कामात त्यात साथ देतात. अनिल भाऊ हे स्वतः एक उत्कृष वक्ता व तसेच राजकारणात आणि समाजकारणात एक उत्कृष्ट भूमिका बजावत असतात. अनिल भाऊ हे एक डॅशिंग नेतृत्व असून त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी ते मुख्य भूमिका बजावत असतात.

सौ. योगिता वाघ या एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असून, त्या भडगाव येथील जिजामाता शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानदानाचे कार्य सांभाळत असतानाच त्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सातत्याने आपले अमूल्य योगदान देत असतात. या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.

त्यांची सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. यापूर्वी सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करताना त्यांनी विविध स्तरांवरील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या याच कामाचा आणि अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे भडगाव शहरातील पक्ष संघटनेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कृतिका आफ्रे तसेच मंडळाध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गायत्री बिरारी, सुनिता शिंपी, शिला पाटील, सुनिता चौधरी, सोनाली चौधरी, मोनाली बागल आणि नसीम बानो पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी चंदा पाटील, रंजना परदेशी, मनिषा पाटील आणि सुनिता माळी यांची निवड करण्यात आली असून चिटणीसपदी भावना राजपूत, हेमलता शिंपी, ज्योती पाटील, शारदा पाटील, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील आणि निता भंडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदी योगिता वाघ, कोषाध्यक्षपदी मनिषा पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी मिनाक्षी पाटील तर सोशल मीडिया प्रमुखपदी रूपाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विविध पदांवर अनेक कार्यकर्त्यांना संधी देत विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या निवडीबद्दल आमदार दिलीप वाघ, महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी, युवानेते अमोल शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button