BLO शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

BLO शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर | प्रतिनिधी :
SIR कामाच्या वाढत्या ताणासह विविध मागण्यांसाठी अमळनेर तालुका BLO न्याय हक्क समितीच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने घरगणनेच्या कामाला BLO यांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या .
जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रात घरगणनेचे काम BLO यांनी करावे, असा स्पष्ट उल्लेख नसतानाही तसेच SIR कार्यक्रमाच्या वेळापत्रकातही घरगणनेचा उल्लेख नसताना पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून BLO यांच्यावर हे काम सोपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला. त्यामुळे हे काम BLO यांच्याकडून करून घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ERO व AERO यांना अनुक्रमे ३० हजार व २५ हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर BLO यांनाही योग्य मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच वरिष्ठ स्तरावरून वारंवार व अवेळी देण्यात येणारे आदेश केवळ कार्यालयीन वेळेत आणि लेखी स्वरूपात देण्यात यावेत, BLO यांना वारंवार कारवाईच्या धमक्या देणे टाळावे, अशी मागणीही करण्यात आली. निवडणूक कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेता एक वाढीव वेतनवाढ तसेच कामाच्या प्रमाणानुसार जनगणनेच्या धर्तीवर अर्जित रजा देण्यात यावी, अशी मागणी
निवेदनातून करण्यात आली.
या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात तसेच वरिष्ठ स्तरावरील मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
निवेदनावर भगवान एकनाथ पाटील, राजेंद्र गुलाबराव चौधरी ,शाम भालेराव वाघ,अजय भगवान भामरे दिनेश विक्रम शिरसाठ,भूषण सुरेश महाले, सुरेश बाबुराव वाडीले, जितेंद्र जिजाबराव पाटील, नामदेव संतोष अहिरे, रवींद्र त्र्यंबक महाजन, आशिष धरमसिंग राजपुत, प्रसाद प्रभाकर जोशी , रियाज अहमद शेख, रामेश्वर तुकाराम भदाणे, ज्ञानेश्वर तुकाराम गांधलीकर, राजेंद्र दयाराम पारील , मकरंद रमेश निळे , उज्वल अशोक मार्कंडेय,
अतुल राजाराम भोई ,
किरण सुरेश ठाकर , अजय वि. बोरसे, चंद्रकांत भिला पाटील, विशाल संजय साळुंखे, गोविंदा बळीराम माळी, डॉ.कुणाल मुरलीधर पवार , गिरीश युवराज पाटील, गणेश शामराव चव्हाण, प्रदीप नाना सैंदाणे, प्रफुल्ल शरद भदाणे,
श्रीमती सुषमा नारायण तायडे, कविता पाटील,मनिषा बन्सीलाल पाटील, विकास सुंदरलाल चौधरी,जगदिश शिवाजी पाटील , सुधीर शांताराम चौधरी,हर्षल सतिबराव सोनवणे , संजीव विठ्ठल पाटील ,प्रेमराज पवार , सागर आधार महाजन,ज्ञानेश्वर छबिलाल भदाणे, राहूल चैतन्य महाजन , राहुल राजेंद्र पाटील, भटेश्वर नानाभाऊ भदाणे, भरत रामदास पाटील,
जयेश हेमलाल लोहार, नरेश यशवंत पाटील, प्रशांत विजयराव कापडणे, सुधीर अनिक पाटील ,भुपेद्र बळीराम वानखडे , गुलाब सकाराम बोरसे, सुमेध मनोहर मोहिते , महेंद्र अर्जुन रत्नपारखी , चिंतामण हेमराज धनके, धिरज रतिलाल कोठवाल, प्रदीप सुखदेव पाटील, कैलास रामधर बाविस्कर, जितेंद्र वसंत वाणी विनित सुधाकर कुळकर्णी
राहुल भानुदास देसले, अजय मोतीलाल महाजन,म.आसिम अ. नईम, विनोद गुलबराव भदाणे , दिनेश सुरेश कार्लेकर , विकास गोपीचंद पाटील, जयवंत भीमराव पाटील,ज्ञानेश्वर बापू मोरे ,आर आर. पाटील ,राहुल चैतन्य महाजन, नंदलाल हिंमतराव पाटील अरविंद मुकुंदराव भामरे, विनोद गुलाबराव पाटील,महेश धर्मा बोरसे यांच्या सह शेकडो BLO शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वरील मागण्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी मा. प्रांत साहेबांनी दिले. याप्रसंगी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार प्रशांत धमके उपस्थित होते.





