राज्यातील पीओपी मूर्ती निर्मितीवरील बंदी उठवा-आ. अनिल पाटील

अमळनेर : महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी आ. अनिल भाईदास पाटील यांनी विधी मंडळाच्या सभागृहात केली.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील मूर्तिकार संघटनेच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी आ. अनिल पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पीओपी मूर्ती निर्मितीवरील बंदीमुळे होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आ. अनिल पाटील यांनी सरकारकडे या निर्णयावर पुनर्विचार करून मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी केली. बंदीमुळे मूर्तिकारांचे रोजगार धोक्यात आल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान, आ. अनिल पाटील यांनी यापूर्वीच मूर्तिकार संघटनांना त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगानेच त्यांनी काल सभागृहात ठाम भूमिका घेत, सरकारने यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.