रोटरी क्लब ऑफ चोपडाकडून दुर्गम गोलबल्ली पाड्यावर फराळ वाटप

रोटरी क्लब ऑफ चोपडाकडून दुर्गम गोलबल्ली पाड्यावर फराळ वाटप
आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी!
चोपडा प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ चोपडाने आपली सामाजिक बांधिलकी जपत यंदाची दिवाळी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला. क्लबतर्फे चोपडा तालुक्यातील गोलबल्ली पाडा येथील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता हा ‘दिवाळी फराळ वाटप’ प्रकल्प पार पडला. मालापूर या गावाजवळून रस्ता नसलेल्या दुर्गम अशा गोलबल्ली पाड्यावर रोटरी बांधवांनी पोहोचत प्रत्येक गरजू कुटुंबाला फरसाण आणि मिठाई समाविष्ट असलेले किट वाटप केले. रोटरी बांधवांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून एक नवा आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विकेश पावरा यांनी केले. यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. आशिष जैसवाल यांनी क्लब नेहमीच आदिवासी व दुर्गम भागातील बांधवांच्या सेवेसाठी तत्पर राहील, तसेच लवकरच या भागामध्ये विविध सेवा प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
या सेवा कार्यक्रमासाठी प्रकल्प प्रमुख रोटे. संजय बारी, सचिव रोटे. विश्वास दलाल, माजी सह प्रांतपाल अभि. व्ही एस पाटील, माजी अध्यक्ष विलास पी पाटील सर, यांच्यासह रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विकेश पावरा, संतोष नादान पावरा, शेवलाल पावरा, विकास नाना पावरा आणि पोलीस पाटील गजमल पावरा यांनी विशेष सहकार्य केले. रोटरीच्या या उपक्रमाबद्दल आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.






