१९९८ च्या बॅचचा ऐतिहासिक ‘स्नेहमेळावा’!

१९९८ च्या बॅचचा ऐतिहासिक ‘स्नेहमेळावा’!
जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रमैत्रिणींनी साधला तब्बल २७ वर्षांनी संपर्क!
चोपडा प्रतिनिधी , राजेंद्र माध्यमिक विद्यामंदिर गोरगावले बु! येथे १९९८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तब्बल २७ वर्षांनी२६ऑक्टोबर रोजी एकत्र आले. या ऐतिहासिक ‘स्नेहमेळाव्या’ने (गेट-टुगेदर) जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि या सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणली. या सोहळ्याला संस्थेतील आदरणीय शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन माजी शिक्षक डि.के. सोनवने यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षक सेकंड पी. व्ही.पाटील सर हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिक्षक प्रतिनिधी म्हणून माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील सर होते. त्यांनी आपल्या भाषणात १९९८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे नियोजन करिता योगदान आणि एकजूट कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शाळेचे आजी मुख्याध्यापक अंबर पाटील यांनी आयोजकांना स्नेह मेळावा भरून माजी आजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजकांचे आभार मानले… माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी व आजी शिक्षकांच्या व शिक्षिकतेतर कर्मचारी. पी व्ही पाटील डी के सोनवणे एस के पाटील. पी. बी देशमुख ए आर चौधरी पी डी बाविस्कर एन बी पाटील जी आर पाटील एन डब्ल्यू पाटील. एम.डी चौधरी व्ही के महाजन जीवन सर शाळेचे मुख्याध्यापक अंबर पाटील सोनार भाऊसाहेब मोहन कुंभार आधार पाटील अभिमान दादा वासुदेव बोरसे सुनील बोरसे सुनील कोळी बाळू महाजन ताराचंद साळुंखे यांना शाल,श्रीफळ, भेटवस्तू देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकाली निघून गेलेले दिवंगत शिक्षक व मित्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वर्गात जाऊन क्लास भरून जुन्या आठवणींना उजाळा दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर बाविस्कर तर प्रास्ताविक प्रशांत बाविस्कर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी, आयोजक समितीचे राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांनी एकत्र स्नेहभोजन घेऊन अविस्मरणीय दिवसाची सांगता केली. या कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण पाटील रुपेश अहिरे, भरत बाविस्कर चंद्रकांत सरदार, स्नेहल चौधरी उज्वला पाटील सरिता महाजन पल्लवी पाटील यांनी मेहनत घेतली.






