Education

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न

चोपडा : रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने इयत्ता १०वी व १२वीतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह रोटरी परिवारातील गुणवंतांचा ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६’ रोटरी भवन, चोपडा येथे दि. २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात चोपडा शहरातील दहावी व बारावीतील एकूण ३७ गुणवंत विद्यार्थी तसेच रोटरी परिवारातील १० सदस्य अशा एकूण ४७ गुणवंतांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथींचा परिचय रोटे. संजय बारी यांनी करून दिला, तर माजी अध्यक्ष विलास पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रोटे. विश्वास दलाल यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे. व्ही. एस. पाटील, रोटे. रमेश वाघझाडे, रोटे. भालचंद पवार, रोटे. लीना पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button