शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी | जळगाव जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सायबर गुन्हे प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम १५ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश यामागे होता.
हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (IPS), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच भुसावळ उपविभागीय अधिकारी (DySP) नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.
कार्यक्रमात पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सायबर तज्ज्ञ पीएसआय सचिन रणशेवरे (गुन्हे शोध पथक), पीएसआय संजय तडवी, आणि पोलीस शिपाई सागर देोरे (सायबर क्राइम विभाग) यांनी मार्गदर्शन केले.
सायबर सुरक्षेबाबतच्या वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक, बनावट वेबसाईट्स, पासवर्ड सुरक्षा, सोशल मीडियावरील जोखीम यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, सायबर गुन्हा घडल्यास कशी तक्रार द्यावी व पोलिसांची मदत कशी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पोलिसांच्या या उपक्रमाचे महाविद्यालयीन परिसरात कौतुक होत आहे.






