स्थानिक स्वराज्य मतदार संघात , चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार ,

स्थानिक स्वराज्य मतदार संघात , चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार ,
चाळीसगाव:-(प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत ,चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिलदादा देशमुख ,शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक व दोन अपक्ष नगरसेवक असे एकूण 13 नगरसेवकांनी स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे,
चाळीसगाव येथे लोकनेते अनिलदादा देशमुख आघाडीच्या नगरसेवकांनी व दोन अपक्ष नगरसेवक यांनी दुपारी दोन वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड येथील बंगल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, जळगाव येथे होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा , पत्रकारांना आपला निर्णय सांगितला,
आपल्या आपल्या निर्णयावर बोलताना अपक्ष नगरसेविका सौ सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी सांगितले की,
निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मतदारांपर्यंत साध मत मागायला आले नाही, अशा उमेदवारांला मत आम्ही कसे द्यायचे ?असा प्रश्न आम्हाला पडला आहे? निवडणूकीत जे अपक्ष उमेदवार उभे होते त्यांनी एक एक करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याने आम्ही या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला, असे चाळीसगाव शहर आघाडीचे गटनेते दीपक पाटील नगरसेवक घृष्णेश्वर पाटील तसेच ज्येष्ठ व अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी व रोशन जाधव यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आपला निर्णय सांगितला,
यावेळी चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व दोन अपक्ष नगरसेवक उपस्थित होते,





