Education

म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भुसावळ प्रतिनिधी नगरपरिषद संचलित म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजेपासूनच शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात पताका लावल्या आकर्षक रांगोळ्या काढल्या. तसेच देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला.

शाळेच्या ध्वजारोहणाचा मान महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभा इंगळे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, माजी सभापती मीना लोणाऱी, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम नारखेडे, प्रा.आर. बी. इंगळे, वेद प्रकाश ओझा, राकेश चंदन, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने आणि सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका शिक्षक मंडळाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजसंचालन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. सर्वप्रथम वंदे मातरम् सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

त्यानंतर राज्यगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमानंतर महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभा इंगळे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक कैलास चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी पोह्यांची व्यवस्था केली, तर रोनक भराडिया यांच्याकडून मोतीचूरचे लाडू देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे रिक्षाचालक दादाराव पाटील यांनी परिश्रम घेतले.

देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button