Crime

औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून मेडिकल चालकाला सहा लाखांचा चुना

जळगाव : :-औषध साठ्याची सैन्य दलात आवश्यकता असल्याचे सांगून एका भामट्याने चाळीसगावातील मेडिकल चालकाला सहा लाख रुपयांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव)  हे वास्तव्यास असून त्यांचे मेडीकल आहे. त्यांना दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता एका अनोळखी व्यक्तीने मोबाईवरुन संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यासाठीची यादी व्हाटसअॅपवर पाठवतो, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा असे सांगितले. यादी मिळाल्यावर समोरील व्यक्तीने तम्ही फोन पे वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. सुनिल चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले.

तसेच सुनिल चौधरी यांचा मुलगा जयदीप याला चौधरींच्या मोबाईलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडीट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाईन काढून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येतच चौधरी यांनी जळगाव येथील सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button