Crime

नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीमधून एक लाखाची रोकड लांबविली !

जळगाव शहरातील घटना ; हेल्मेटधारी चोरट्याचा शोध सुरु

नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीमधून एक लाखाची रोकड लांबविली !

जळगाव शहरातील घटना ; हेल्मेटधारी चोरट्याचा शोध सुरु

जळगाव I प्रतिनिधी ;– बँकेमधून एक लाखांची रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाची रोकड एका हेल्मेटधारी चोरट्याने अलगद चोरून नेल्याची घटना १० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शेख शोएब शेख शकील (वय २८, रा. गुलशनेरजा कॉलनी, पिंप्राळा) खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. शोएब शेख यांनी एका बँकेतून ८३ हजार रुपये काढून १७ हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये काढून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन दिले. यानंतर रिंग रोड वरील मशिदीत दुचाकी लावून नमाज पठणासाठी निघून गेले होते.

मात्र याठिकाणी काही नागरीकांनी आरडाओरड करून अज्ञात इसम कुणाच्या तरी दुचाकीच्या डिक्कीमधून काढत असल्याचे लक्षात आले. मात्र हेल्मेटधारी चोरटा हा थोड्या अंतरावर असलेल्या दुचाकीवर बसून पळून गेला.

हि घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून देखील ते मिळून न आल्याने शोएब शेख यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button