Other

नवीन आयकर अधिनियम व नियमांबाबत जळगावात जनजागृती कार्यक्रम

नवीन आयकर अधिनियम व नियमांबाबत जळगावात जनजागृती कार्यक्रम

जळगाव,– संयुक्त आयकर आयुक्त (टीडीएस), रेंज, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयकर अधिकारी (टीडीएस), जळगाव कार्यालयातर्फे दिनांक २ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिषद कक्ष, जळगाव येथे “नवीन आयकर अधिनियम, 2025 व आयकर नियम, 2026” या विषयावर करकपातकर्त्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग-2, जळगाव येथील अधिकारी व कर्मचारी, विशेषतः लेखा आणि आस्थापना शाखेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात आयकर अधिकारी कुणाल आर. वाघ यांनी नवीन आयकर अधिनियम, 2025 आणि आयकर नियम, 2026 याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेला नवीन आयकर अधिनियम हा १९६१ च्या आयकर अधिनियमाची जागा घेणारा असून करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक, डिजिटल, विश्वासाधारित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे.

यावेळी त्यांनी शासनाच्या महसूल संकलनात टीडीएसचे महत्त्व अधोरेखित करत टीडीएस/टीसीएसमधील प्रमुख बदल, नवीन कलमे, नियम, विहित नमुने, विवरणपत्रे सादर करण्याच्या कालमर्यादा, विविध अनुपालनाच्या तरतुदी तसेच TRACES 2.0 पोर्टलवरील नोंदणी व संपर्क तपशील अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान वेतनावरील टीडीएस, कंत्राटदार व व्यावसायिकांना करण्यात येणाऱ्या देयकांवरील टीडीएस, टीडीएस/टीसीएस विवरणपत्रे भरणे तसेच नवीन अधिनियमांतर्गत अनुपालनासंदर्भातील उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे संवादात्मक पद्धतीने निरसन करण्यात आले.

उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नवीन आयकर अधिनियम व नियमांबाबत जागरूकता वाढण्यास तसेच टीडीएस अनुपालन अधिक प्रभावीपणे राबविण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button