जळगाव सी.ए. शाखेस आयसीएआयचे उपाध्यक्ष मा. सीए. मंगेश किनरे यांची सदिच्छा भेट

जळगाव सी.ए. शाखेस आयसीएआयचे उपाध्यक्ष मा. सीए. मंगेश किनरे यांची सदिच्छा भेट
जळगाव दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या जळगाव शाखेस शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी आय.सी.ए.आय.चे उपाध्यक्ष मा. सी.ए. मंगेश किनरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय परिषद सदस्य (CCM) सी.ए. दुर्गेश काबरा तसेच सी.ए. पियुष छाजेड हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जळगाव शाखेचे अध्यक्ष सीए. रोशन रुणवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आपल्या मनोगतात त्यांनी जळगाव शाखेच्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत शाखेच्या भावी वाटचालीचा आढावा सादर केला.
त्यानंतर सेंट्रल कौन्सिल सदस्य सी.ए. पियुष छाजेड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आय.सी.ए.आय.च्या विविध उपक्रमांची माहिती देत चार्टर्ड अकाउंटंट्सनी बदलत्या व्यावसायिक वातावरणात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या संधींचा स्वीकार करून स्वतःला अधिक सक्षम बनविण्याचे आवाहन केले.
यानंतर सेंट्रल कौन्सिल सदस्य सी.ए. दुर्गेश काबरा यांनी आपल्या भाषणात आय.सी.ए.आय.च्या सदस्य व विद्यार्थी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यावसायिक विकासाच्या संधींची माहिती दिली. तसेच गुणवत्तापूर्ण सेवा, सातत्यपूर्ण अध्ययन आणि नैतिक मूल्यांचे पालन हीच यशस्वी चार्टर्ड अकाउंटंटची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शन करताना आय.सी.ए.आय.चे उपाध्यक्ष मा. सीए. मंगेश किनरे यांनी चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसायाचे बदलते स्वरूप, जागतिक स्तरावर वाढणाऱ्या संधी आणि भविष्यातील व्यावसायिक आव्हानांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच सदस्यांनी तांत्रिक ज्ञान अद्ययावत ठेवत उच्च व्यावसायिक नैतिकता जपत समाजाप्रती आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मे २०२६ मध्ये झालेल्या सी.ए. फायनल, इंटरमिजिएट व फाउंडेशन परीक्षेमध्ये जळगाव शहरातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, उपाध्यक्ष व सी.ए. विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. सोहन नेहेते, सेक्रेटरी सी.ए. करण काबरा, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. नचिकेत जाखेटीया, तत्काळ माजी अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल, सहकारी सदस्य सी.ए. तृप्ती राठी व सी.ए. हितेश जैन सी.ए. सभासद तसेच सी.ए. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए. तृप्ती राठी व आभारप्रदर्शन सी.ए. करण काबरा यांनी केले.






