Other

जामनेर येथे 21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जामनेर येथे 21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जळगाव, : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव या कार्यालयामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर जिल्हा जळगाव, या ठिकाणी दि. 21 मे, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये क्वेस कॉर्प प्रा. लि. पुणे व युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव. या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या मेळाव्यास 10 वी, 12वी, ITI, बी.कॉम., एम.कॉम., ग्रॅज्युएट तसेच इतर पात्रता धारक उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या महा स्वयंरोजगार व रोजगार पोर्टल या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेली असल्यास आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात काही अडचण असल्यास अथवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button