Crime

जळगाव शहर हादरले : तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, गोळीबार झाल्याची चर्चा

छत्रपती शिवाजी महाराज नगरातील घटना : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास एका तरुणाच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्रांनी सज्ज होऊन आलेल्या हल्लेखोरांनी घरावर हल्ला करण्याच्या उद्देशाने दहशत माजवल्याची माहिती असून, या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याचीही परिसरात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगरात राहणाऱ्या एका तरुणाच्या घराला लक्ष्य करून काही हल्लेखोरांनी मंगळवारी सायंकाळी अचानक धाव घेतली. हल्लेखोरांकडे धारदार शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथकही घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करून घटनेची माहिती घेतली जात आहे. हल्लेखोरांची ओळख, हल्ल्यामागील नेमके कारण आणि गोळीबार झाल्याच्या चर्चेतील तथ्य याबाबत पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच घटनेचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button