Other

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कार

आयएमए जळगावचा दुहेरी सन्मान; ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच’ पुरस्कारानेही गौरव

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्कार

आयएमए जळगावचा दुहेरी सन्मान; ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच’ पुरस्कारानेही गौरव

जळगाव, प्रतिनिधी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा ‘प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६)’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगावचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित ‘मॅस्टाकॉन-२०२६’ आणि ‘आयएमएकॉन-२०२६’ या राज्यस्तरीय परिषदेत १४ नोव्हेंबर रोजी त्यांचा गौरव करण्यात आला. याच परिषदेत आयएमए जळगाव शाखेला ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर येथील आयएमए हाऊसमध्ये झालेल्या ६६ व्या वार्षिक राज्य परिषदेत हा पुरस्कार सोहळा पार पडला. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची परिषदेला प्रमुख उपस्थिती होती.

आयएमए महाराष्ट्राचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. बोरोले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय कदम, कार्यकारिणी सदस्य डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, मावळते राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिट्टे उपस्थित होते.

संघटनात्मक योगदानाची दखल

वैद्यकीय क्षेत्रातील संघटनात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी, डॉक्टरांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आयएमएच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यांची दखल घेऊन डॉ. भरत बोरोले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाल्याने जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

जळगाव शाखेचेही उल्लेखनीय यश

या परिषदेत आयएमए जळगावच्या अन्य डॉक्टरांचाही गौरव करण्यात आला. डॉ. अनिता भोळे, डॉ. लीना पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि डॉ. निरंजन चव्हाण यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्याची दखल घेत आयएमए जळगाव शाखेला ‘बेस्ट इको फ्रेंडली ब्रँच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. त्यामुळे या परिषदेत जळगाव शाखेने दुहेरी यश संपादन केले.

‘हा संपूर्ण टीमचा सन्मान’

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. भरत बोरोले यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून आयएमए जळगाव परिवाराच्या एकजुटीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे सांगितले. आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. विलास भोळे, डॉ. अनिता भोळे, डॉ. स्नेहल फेगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांच्या योगदानामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्कारप्राप्त डॉक्टरांचे अभिनंदन केले. वैद्यकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button