Politics

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

जळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन शनिवारी बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, शुचिता हाडा, अमित काळे, अंकिता पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व रुंद रस्ते निर्माण करणे ही काळाची गरज आहे. रिंग रोडच्या विकासामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास तसेच शहराच्या विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवरांनीही या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत, काम उच्च दर्जाचे आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भूमिपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी विकासकामाच्या यशस्वी आणि वेळेत पूर्णत्वासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button