Other

समर्थ हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सुरू

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील नामांकित सर्जन डॉ.ए.जी.भंगाळे यांच्या समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आता महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना प्रभावीपणे सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प खर्चात किंवा मोफत आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या सुविधांमुळे उपचारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून, जळगावातच अत्याधुनिक उपचार सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. रुग्णालयात नुकतीच अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीसारखे महत्त्वपूर्ण उपचार आता स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले आहेत.

गंभीर आजार उपचार, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध
विशेष म्हणजे पात्र रुग्णांना या सेवा महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय विविध गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आधुनिक आरोग्यसेवा, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि विश्वासार्ह उपचार मिळणार आहेत.

५ दशकांची निस्वार्थ वैद्यकीय सेवा
डॉ.ए.जी.भंगाळे यांनी गेल्या पाच दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात दिलेली निस्वार्थ सेवा आणि रुग्णांप्रती असलेली बांधिलकी आजही कायम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ हॉस्पिटलने आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button