Crime

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; सराईत हद्दपार आरोपी ‘भोमपाली’ जेरबंद, ३५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत असताना कारवाई; आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगलसह आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; सराईत हद्दपार आरोपी ‘भोमपाली’ जेरबंद, ३५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत असताना कारवाई; आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगलसह आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध धडक कारवाई करत त्याच्याकडून विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त केले आहे. गेंडालाल मिल परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील हद्दपार सराईत गुन्हेगार विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२), रा. बौद्ध विहाराजवळ, गेंडालाल मिल, जळगाव हा गेंडालाल मिल परिसरातील लोकशेड भागात विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील गेंडालाल मिलजवळील लोकशेड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (मॅगझीनसह) जप्त करण्यात आले.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपी विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल, शस्त्र कायदा आदी गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडणे, राहुल रगडे आणि प्रदीप सपकाळे यांच्या पथकाने केली. या पथकाच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button