Politics

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन तर रायगडसाठी भरत गोगावले यांची नियुक्ती

सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी; प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन तर रायगडसाठी भरत गोगावले यांची नियुक्ती

सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी; प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती

मुंबई: नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांमधील रिक्त असलेल्या पालकमंत्रिपदाचा तिढा राज्य शासनाने अखेर सोडवला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार मंत्री गिरीश गितादत्तात्रय महाजन यांना नाशिकचे तर मंत्री भरत विठाबाई मारुती गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्हा हा राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. आगामी काळातील विकासकामे आणि नियोजनाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या महाजन यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय समन्वयाचीही महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. या निर्णयामुळे महाजन यांचे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थान अधिक बळकट झाले असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button