Politics

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चार तास घेराव

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चार तास घेराव

डिझेलटंचाईमुळे शेतकरी हवालदिल; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी तसेच ट्रॅक्टर, मळणी यंत्रे व अन्य कृषी वाहनांसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी चार वाजेपासून ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही शासकीय वाहन बाहेर जाऊ दिले नाही.

शेतकऱ्यांना वेळेत डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांना प्रशासनाकडून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तहसील कार्यालये व इतर शासकीय कार्यालयांबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच कोणतेही शासकीय अधिकारी, आमदार किंवा खासदार यांची वाहने जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाहीत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, वाय. एस. महाजन, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, रमेश पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी, रिकू चौधरी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, मजर पठाण, गौरव वाणी, संजय पाटील, आकाश हिवाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button